मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना
देशामध्ये सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे ६ हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये दिले जातात. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांना थोडा आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे अनुकरण करून देशातील सर्व राज्य सरकारनी मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करावी आणि शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये द्यावेत असे केंद्र शासनातर्फे राज्य सरकारांना सुचवण्यात आले आहे. आपले महाराष्ट्र सरकार या योजनेचा विचार करत आहे. आलेल्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, लवकरच महाराष्ट्रातही मुख्यमंत्री किसान सन्मानित योजना सुरू करण्यात येईल आणि शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातील. म्हणजे शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या योजनेचा फायदा अल्पभूधारक शेतकऱ्यांना जास्त होणार आहे.
50000 अनुदान योजना तपशील जाणून घ्या येथे क्लिक करा