Join our WhatsApp group

आता नागरिकांसाठी "आभा हेल्थ कार्ड" मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले नोंदणीसाठी आवाहन

Health Card राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सर्व नागरिकांना आभा हेल्थ कार्ड नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी या हेल्थ कार्ड चे फायदेही समजावून सांगितले. या पोस्टमध्ये आपण आभा हेल्थ कार्ड कसे काढावे आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेत आहोत.

आभा हेल्थ कार्ड

आभा हेल्थ कार्ड च्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड म्हणजेच आभा बनवत आहे. या कार्डवर नोंदणी कशी करावी? याची माहिती आपण येथे घेत आहोत.


आभा हेल्थ कार्ड नोंदणी कशी करावी

सर्वप्रथम healthid.ndhm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा

ड्रॉप डाऊन मेनू मधून (आयुष्मान भारत आरोग्य खाते) डिजिटल हेल्थ कार्ड क्रिएट अकाउंट निवडा.

2022 मध्ये डिजिटल हेल्थ कार्ड साठी नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वर क्लिक करा. 

नाव, पत्ता, फोन नंबर, प्राप्त झालेला ओटीपी आणि इतर आवश्यक माहिती भरा. 

अशाप्रकारे तुम्ही डिजिटल हेल्थ कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. 


आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, मोबाईल नंबर, जन्म प्रमाणपत्र आणि पत्ता आवश्यक आहे. डिजिटल हेल्थ कार्ड साठी नोंदणी करण्यासाठी पॅन कार्ड देखील वापरले जाऊ शकते.

फायदे

या हेल्थ कार्ड मध्ये तुम्हाला 14 अंकी नंबर मिळतो. या कार्डसोबत रुग्णांचे आरोग्याची संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल. या कार्डच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात. म्हणजेच या कार्डद्वारे कोणतेही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे.




Post a Comment

Previous Post Next Post