रुपये एक लक्ष पर्यंतची थेट कर्ज योजना
या योजनेसाठी पात्रता काय आहे याची माहिती पुढील प्रमाणे.
अर्जदार इतर मागासवर्गीय (OBC) समाजातील असावा
अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे
अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोर किमान 500 इतका असावा.
निमित्त 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्दल रुपये २०८५/- परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु नियमित परत पेढे न करणाऱ्या लाभार्थींना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर दसादशे ४ टक्के व्याजदर आकारण्यात येईल.
कर्ज रकमेचा पहिला हप्ता रुपये 75000/- इतका असतो.
दुसरा हप्ता रुपये 25 हजार प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायनुसार देण्यात येतो.
अर्ज सोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशील.
जातीचे महामंडळाच्या वेब पोर्टलवर नाव नोंदणी अनिवार्य आहे, शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो.
व्यवसाय स्थळाची भाडे पावती, करारनामा, ७/१२ चा उतारा,
जन्मतारखेचा दाखला
आठ वर्षे सेवा शिल्लक असलेल्या दोन जामीनदारांची हमीपत्रे अथवा शेतीचे गहाण खत तसेच दोन्ही पर्यायातील जामीनदाराचे संमती पत्र
अर्जदाराने अर्ज सोबत मूळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षांकित प्रति जोडाव्यात.
अर्जदार आणि संबंधित जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक त्यांचे शी संपर्क साधावा.