नमस्कार शेतकरी बंधूंनो, पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे दोन हजार रुपयेचा हप्ता येण्याची तारीख निश्चित झाले आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत. बऱ्याच शेतकऱ्यांची केवायसी राहिली असल्याने त्यांना दिनांक सात सप्टेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आले आहे. केवायसी झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे. तो कोणत्या दिवशी मिळणार याची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.
या दिवशी जमा होईल पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपये चा बारावा हप्ता
दिनांक 12 सप्टेंबर 2022 या दिवशी पीएम किसान सन्मान योजना चा दोन हजार रुपयाचा पुढील हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. पी एम किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. योजना अंतर्गत आतापर्यंत एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले गेले आहेत. आता पुढील बारावा हप्ता शेतकऱ्यांना येत्या 12 सप्टेंबर या दिवशी जमा होणार आहे. यासाठी ज्या शेतकऱ्यांची आधार केवायसी राहिले आहे त्यांनी 7 सप्टेंबर पूर्वी केवायसी करून घेणे बंधनकारक आहे.
ई केवायसी करण्याची ही आहे शेवटची तारीख
शेतकरी मित्रांनो, शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार केवायसी करणे बंधनकारक केले आहे. आता केवायसी करण्यासाठी 7 सप्टेंबर पूर्वी शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्यायची आहे. 7 सप्टेंबर 2022 ही केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे.