PM Kisan E KYC प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी करणे शासनाने बंधनकारक केले आहे. यासाठी या अगोदरही मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही अजून बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार ई-केवायसी राहिली असल्याने सरकारने यास चालू सप्टेंबर महिन्याची मुदत वाढ जाहीर केली आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत राज्यात आज अखेर एकूण 1 कोटी 10 लाख लाभार्थ्यांना, 20 हजार 235 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असून 11 लाख 39 हजार नवीन लाभार्थ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची मोठी संख्या पाहता शेतकऱ्यांच्या केवायसी प्रमाणीकरणास राजाला सप्टेंबर 2022 पर्यंत मुदत वाढ द्यावी अशी मागणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे केली होती. केंद्रीय कृषिमंत्री तुम्हारी यांनी ही मागणी मान्य केली आहे. आणि महाराष्ट्र राज्यासाठी अजून महिनाभर मुदतवाढ मिळाली आहे म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकरी 30 सप्टेंबर पर्यंत ई-केवायसी करू शकतात.
ई-केवायसी झाली आहे का नाही हे येथे क्लिक करून तपासा
Tags:
pm kisan e-kyc