राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, अनुदान 20 हजार रुपये, जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

नमस्कार मित्रांनो, भारत सरकार नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना आणत आहे. यामध्ये राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही एक योजना आहे ज्यामध्ये लाभार्थी कुटुंबाला एक रक्कमी वीस हजार रुपये शासनाकडून दिले जातात. या लेखामध्ये आपण राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची परिपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना 

कुटुंबातील कमवती व्यक्ती मयत झाली असल्यास त्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी या योजनेतून 20 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. एखाद्या कुटुंबाच्या कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सरकारकडून मिळणारी ही मदत ही खूप लाख मोलाची ठरू शकते. आवश्यक कागदपत्रे

कुटुंबातील कमवती व्यक्ती मयत असल्यास मयत झाले पासुन एक वर्षाच्या आत तहसीलदार कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे.

मयत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. 

कुटुंब दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक.


मिळणारे फायदे

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतून पात्र लाभार्थी कुटुंबाला फक्त एकदाच एक रकमे 20000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. 

अर्ज कसा करावा

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव- जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालयPost a Comment

Previous Post Next Post