![]() |
sanjay gandhi niradhar anudan yojana |
संजय गांधी निराधार अनुदान योजना अर्ज कसा करावा?
ही योजना महाराष्ट्र राज्यातील निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य करण्यासाठी शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश निराधार लोकांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे.
ही योजना कोणासाठी आहे.
संजय गांधी निराधार योजना 65 वर्षापेक्षा कमी असलेल्या निराधार व्यक्तींसाठी आहे. या योजनेमध्ये निराधार व्यक्ती, अपंग, अनाथ मुले, घटस्फोटीत महिला, अविवाहित महिला, दुर्लक्षित महिला, वैशाव्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया, ट्रान्सजेंडर महिला अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेमध्ये किती पेन्शन मिळते
संजय गांधी निराधार योजनेतून लाभार्थी निराधार व्यक्तीला दरमहा एक हजार रुपये पेन्शन दिली जाते. व्यक्तीला जीवनावश्यक वस्तू विकत घेता याव्या यासाठी हे मानधन दिले जाते.
अर्ज कसा करावा?
संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचा अर्ज तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयामध्ये, संजय गांधी निराधार अनुदान योजना, विभागाला अर्ज करावा लागतो.
अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अपंग व्यक्ती असल्यास सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक द्वारे जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक असतात.