नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेत जमिनीचा फेरफार, सातबारा आणि खाते उतारा ही कागदपत्रे तुम्ही तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाइन पद्धतीने काढू शकता. शेत जमिनीचा फेरफार ऑनलाइन कसा काढायचा याची माहिती आपण लेखा मध्ये घेणार आहोत.
शेत जमिनीचा फेरफार ऑनलाइन काढा या पद्धतीने.
शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतकरी ची सर्व कागदपत्रे तुम्ही एका क्लिकवर पद्धतीने काढू शकता. तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरजही लागणार नाही. महाराष्ट्रासाठी शेतीची ऑनलाईन कागदपत्रे काढण्यासाठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ ही वेबसाईट आहे. तुम्हाला या वेबसाईटवर तुमचे प्रोफाईल बनवावे लागेल. बनवल्यानंतर तुम्ही शेतीचा फेरफार काढू शकता.
शेत जमिनीचे कागदपत्र मध्ये सातबारा खाते उतारा तसेच फेरफारही कागदपत्र महत्त्वाचा आहे. अनेक वेळा शेतकऱ्यांना शेत जमिनीच्या मालकीबद्दल जाणून घ्यायचे असते.
फेरफार ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड बनवावे लागतात.
पासवर्ड आणि यूजर आयडी बनवल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर लॉगीन व्हावे. प्रत्येक कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला पंधरा रुपये इतका चार्ज करतो. फेरफार करण्यासाठी पंधरा रुपये इतका खर्च येतो.
त्यानंतर फेरफार या ऑप्शन वर क्लिक करावे आणि आवश्यक ती माहिती भरून तुमच्याकडे फार ऑनलाईन काढू शकता.