नमस्कार शेतकरी बंधूंनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान योजना, या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र नाहीत, कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नाही याची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.
यांना लाभ मिळणार नाही
आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार, आणि खासदार.
केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक पंचवीस हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) चतुर्थ श्रेणी वगळून
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत उपक्रमाची अधिकारी, कर्मचारी (मासिक पंचवीस हजार पेक्षा जास्त वेतन असणारे)
सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक पंचवीस हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी.
पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेणाऱ्या व्यक्ती
शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
नियमित कर्ज परतफेड न करणारे शेतकरी
या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये अनुदान