नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन वर शेतकऱ्यांसाठी सर्व योजनांचे अर्ज सुरू आहेत. ट्रॅक्टर खरेदीवर पन्नास टक्के अनुदान यासाठी ही ऑनलाईन अर्ज सुरू आहेत.
ट्रॅक्टर अनुदान योजना
शेतकरी मित्रांनो, सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणत आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण ही एक योजना आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठीही अनुदान देत आहे. सध्या सर्व प्रकारच्या कृषी यंत्रांच्या अनुदानासाठी अर्ज सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन वर शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अर्जासाठी शेतीचा सातबारा आणि खाते उतारा, शेतकऱ्याचे आधार कार्ड, आणि शेतकऱ्याचे बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक असतात.
ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन वर करावा लागेल. अर्ज करत असताना शेतकऱ्यांना कोणतेही कागदपत्र अपलोड करावी लागत नाही. अर्ज करत असताना फक्त आधार कार्ड बँक पासबुक आणि शेतीच्या सातबारा खाते उतारा ची माहिती आवश्यक असते. अर्ज झाल्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लॉटरीमध्ये निवड झाल्याचा मेसेज येईल यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अनुदानाची सर्व प्रक्रिया ऑनलाईन होते शेतकऱ्यांना कोणतेही कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागत नाहीत.