नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड सामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्ड चा उपयोग स्वस्त धान्य घेण्यासाठी तसेच कायदेशीर गोष्टींमध्ये रहिवासी पुरावा म्हणूनही केला जातो. रेशन कार्ड च्या नियमांमध्ये अनेक वेळा बदल होत आहेत. आता रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. ज्या लोकांचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसणार आहे त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे.
रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे आवश्यक.
शासकीय नियमानुसार रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसणार आहे त्या व्यक्तीचे रेशन बंद होणार आहे. त्या व्यक्तीला स्वस्त धान्याचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड बंद होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करून घ्या यासाठी तुम्ही तुमच्या रेशन धान्य दुकानदाराला आधार कार्ड देऊन ते आधार आणि रेशन लिंक करण्यास सांगू शकता. किंवा आधार कार्ड लिंक आहे की नाही हे रेशन धान्य दुकानांमध्ये जाऊन चौकशी करून जाणून घेऊ शकता.
Tags:
ration card updates