सर्व केशरी रेशन कार्डधारक आणि पिवळे रेशन कार्ड धारक यांना सप्टेंबर नंतरही स्वस्त धान्य बरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य ही दिले जाणार आहे. सरकारच्या त्या योजनेची चर्चा होत आहे कारण या योजनेशी 80 कोटी लोक थेट जोडले गेले आहेत. लॉकडाऊन काळात लाभार्थ्याचा त्रास कमी करण्यासाठी मोफत रेशन योजना सुरू करण्यात आली होती. दरम्यान या योजनेच्या मुदत वाढीपूर्वी मोफत रेशन योजना 30 सप्टेंबर पर्यंत वैद्य होती. पण केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ दिल्याने मोफत धान्य योजना आता 31 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
Tags:
ration card updates