या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यानुसार पात्र लाभार्थ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सन 2017- 2018, सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे. या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल घेऊन नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येणार आहे.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही ५० हजार अनुदान
सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्णता परतफेड केलेल्या असल्यास, सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्णता परतफेड केलेल्या असल्यास, संत 2019 20 या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास किंवा सन 2018-19, 2019-20 वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परत पिढीचा देय दिनांक यापैकी जी नंतरचे असेल त्या दिनांक पूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड केले असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 सातवा सन 19-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन पर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2018-19 सण 2019 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णता परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे रक्कम रुपये पन्नास हजार अपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांनी सन 2018 19 अथवा सन 19 20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेत प्रोत्साहन पर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
प्रोत्साहन पर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये पन्नास हजार या कमाल मर्यादित प्रोत्साहन पर लाभ रक्कम निश्चित करण्यात आले आहे
या योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.