नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना, सरकारकडून काहीतरी अनुदान मिळावे, या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेचे नाव, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपुरा अनुदान असे देण्यात आले. या योजनेचे निकष निश्चित करताना, 2017 18, 2018 19, 2019 20 हे तीन आर्थिक वर्ष निवडले गेले. या तीन आर्थिक वर्षांतील कमीत कमी सलग दोन वर्षे शेतकऱ्याने कर्ज घेऊन विहित कालावधीत कर्जफेड केली असल्यास तो शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहे. या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होईल. शासनाने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बनवली आहे.
शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र असाल, तर सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव आहे का हे तपासून घेऊ शकता. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जावे लागेल. शासनाने या याद्या बँकेमध्ये जाहीर केल्या आहेत. लवकरच या याद्या शासनाच्या वेबसाईटवरही पाहायला मिळतील. सध्या तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जाऊन तुमचे यादी मध्ये नाव आहे का हे पाहू शकता.
Tags:
50 hajar anudan