सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेले आहे. या योजनेमध्ये यादीमध्ये नाव असेल तर शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. केवायसी ची प्रक्रिया तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन करून घेऊ शकता.
पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या योजनेस अनुदानास पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. ही यादी पहिली यादी आहे या यादीमध्ये काही शेतकऱ्यांची नावे नाहीत . आता या योजनेची दुसरी यादी दिनांक 18 ते 19 या दिवशी जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे यादीत नाव नसेल तर शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही लवकरच दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर तुम्हाला सीएससी सेंटर मध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी लागेल.
Tags:
50 hajar anudan