Join our WhatsApp group

50000 अनुदान योजना, या तारखेला येणार दुसरी यादी

 50 hajar Anudan Yojana - महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान या अनुदान योजनेची दुसरी यादी दिनांक 1 नोव्हेंबर 2022 या दिवशी जाहीर करण्यात येईल. असे शासनाने दिलेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे. 


Mahatma jyotirao fule shetkari karj Mukti Yojana antargat protsahan per anudan - Dusari Yadi शेतकरी मित्रांनो, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. ते शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण होऊन त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम पाठवण्यातही आले आहे. 


या योजनेअंतर्गत राज्यभरात एकूण 18 लाख 20 हजार शेतकरी पात्र आहेत. यातील फक्त 8 लाख 30 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आले आहे. यातील 7 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमाही करण्यात आले आहे. आता ज्या शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत नाहीत, ते सर्व शेतकरी दुसरी यादी कधी येईल याच्या प्रतीक्षेत आहेत. 


शासनाने दिलेल्या संकेतानुसार या योजनेची दुसरी यादी १ नोव्हेंबर 2022 या दिवशी जमा करण्यात येईल. यानंतर शेतकऱ्यांना केवायसी करून घ्यावी लागेल. आणि लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. 


50 हजार रुपये अनुदान यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 



सर्व सरकारी योजनांची माहिती - 

Post a Comment

Previous Post Next Post