पन्नास हजार अनुदान योजना यादीत नाव नाही ! कधी येईल दुसरी यादी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

शेतकरी मित्रांनो, नियमित कर्ज फेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. या अनुदानास पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. या अनुदानास पात्र असूनही काही शेतकऱ्यांची नावे या यादीत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दुसरी यादी कधी येईल. ? याची माहिती आपण या लेखामध्ये घेणार आहोत.


महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत त नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची शासनाने जाहीर केले आहे. या योजनेमध्ये सन 2017 18, सन 2018 19 आणि सन 2019 20 या तीन आर्थिक वर्षातील कोणत्याही दोन आर्थिक वर्षात नियमित कर्जफेड केली असल्यास ते शेतकरी या योजनेस पात्र आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे ते मात्र या योजनेस पात्र नाहीत. 

सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेले आहे. या योजनेमध्ये यादीमध्ये नाव असेल तर शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. केवायसी ची प्रक्रिया तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन करून घेऊ शकता. 

पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या योजनेस अनुदानास पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. ही यादी पहिली यादी आहे या यादीमध्ये काही शेतकऱ्यांची नावे नाहीत . आता या योजनेची दुसरी यादी दिनांक 18 ते 19 या दिवशी जाहीर करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे यादीत नाव नसेल तर शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही लवकरच दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यानंतर तुम्हाला सीएससी सेंटर मध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी लागेल.



Post a Comment

Previous Post Next Post