अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान

Maha dbt farmers schemes शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी सरकार, अनेक योजना आणत आहे. शेतकऱ्यांनी अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करून स्वतःचा विकास करावा यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या मशनरी खरेदीसाठी शासन 50 टक्के अनुदान देत आहे या योजनेचे अर्ज सुरू झाले आहेत. योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा याची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत.

अर्ज कसा करावा? 

Aann prakriya udyog शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योग जसे की डाळ मिल, ऑइल मिल यासारखे अनेक प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी शासन 50 टक्के अनुदान देते. शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांनी त्या उद्योगाचा संपूर्ण अभ्यास करून नंतर मशिनरी खरेदीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी थेट लिंक खाली दिले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही महाडीबीटी या वेबसाईटवर जाल. 





महाडीबीटी पोर्टल वर आल्यानंतर तुम्हाला तुमचे फार्मर प्रोफाईल बनवावी लागते. येथे शेतकऱ्यांनी त्यांची माहिती टाकून यूजर आयडी आणि पासवर्ड बनवून घ्यावा लागतो. यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी ही माहिती भरावी लागते. यानंतर शेतीची संपूर्ण माहिती भरावी लागते जसे की खाते नंबर, गट नंबर आणि क्षेत्र ही माहिती भरावी लागते. त्यानंतर शेतकऱ्यांनी अन्नप्रक्रिया उद्योग हा घटक निवडून अर्ज करावा. अर्ज करताना डाळ मिल ऑइल मिल असे उपघटक निवडावे 

शेतकऱ्यांची अनुदानासाठी लॉटरी पद्धतीने निवड होते. नंतर त्यांना सात दिवसाच्या आत कागदपत्रे अपलोड करावे लागतात. यानंतर मशिनरी खरेदीसाठी पूर्व संमती येते. यानंतर बिल अपलोड करायचे आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना अनुदान बँक खात्यामध्ये दिले जाते. अनुदानाची रक्कम ही खर्चाच्या 45 टक्के ते 55 टक्के पर्यंत असते.



Post a Comment

Previous Post Next Post