Pm Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. आता शेतकऱ्यांना हे पैसे त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. हे पीएम किसान चे दोन हजार रुपये कोणत्या बँक खात्यामध्ये येणार हे या पोस्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
पी एम किसान योजना कोणत्या खात्यामध्ये पैसे येणार हे जाणून घ्या
नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये येणार हे आता तुम्ही जाणून घेऊ शकता तसेच बँक चेंज करायचे असेल तरीही तुम्ही ते बदल करून घेऊ शकता. पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या कोणत्या बँकेत मध्ये येणार हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून. तुम्ही आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता. येथे तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल. आणि मोबाईलवर ओटीपी घेऊन तो तेथे भरून तुम्ही कोणत्या बँक खाते यामध्ये पैसे येणार हे जाणून घेऊ शकता.
पीएम किसान योजनेचे बँक खाते बदलण्यासाठी काय करावे?
मित्रांनो पीएम किसान योजनेचे बँक खाते बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये पैसे घ्यायचे आहेत त्या बँकेमध्ये जावे लागेल. बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्यांना तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड ला लिंक करून देण्यास सांगायचे आहे. बँकेतील कर्मचारी तुमची बँक खाते तुमच्या आधार कार्ड ला लिंक करून देतील. यानंतर तुम्हाला ज्या हव्या त्याच बँक खात्यामध्ये पैसे येण्यास सुरू होतील.
Tags:
pm kisan updates