Maharashtra cabinet decision - महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या (Diwali) अगोदर रेशन कार्डधारकांना दिवाळी भेट देण्याची मोठी घोषणा केली आहे. प्रत्येक रेशन कार्ड धारकाला या दिवाळीमध्ये रवा तेल साखर आणि चणाडाळ या वस्तू फक्त शंभर रुपयांमध्ये दिल्या जाणार आहे. दिवाळीच्या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व रेशन कार्ड धारकांना ही दिवाळीची भेट दिली आहे. या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलोच्या परिमाणात रवा, साखर पाम तेल आणि चणाडा ळ यांचा समावेश असेल. राज्यातील एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे सात कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.
ही दिवाळीची भेट रेशन कार्डधारकांना दिवाळीपूर्वी वाटप व्हावी, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अण्णा व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.