PM Kisan Yojana लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आली, या तारखेला जमा होणार बारावा हप्ता

 

pm kisan benificiary list नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून जाहीर केले आहे की पीएम किसान योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑक्टोंबर 2022 या तारखेला जमा होणार आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येईल हे निश्चित झाले आहे. तसेच पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादीही पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर पाहता येत आहे. 

पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मानधन दिले जाते. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. या योजनेचे एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांना आधार ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्याने केवायसी पूर्ण केले आहे त्यांनाच पुढील हप्ता मिळणार आहे. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही यादीमध्ये नाव आहे का हे तपासून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल. यानंतर संपूर्ण गावाची यादी तुम्हाला पाहता येईल. या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्ता मिळणार हे निश्चित आहे. परंतु त्या अगोदर तुम्ही जर ही केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी.

Post a Comment

Previous Post Next Post