नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा हप्ता वेळोवेळी पुढे ढकलण्यात येत होता. आता हा हप्ता किती तारखेला मिळणार हे निश्चित झाले आहे. पी एम किसान इ केवायसी साठी पी एम किसान योजनेचा हप्ता लांबणीवर पडला आहे.
पी एम किसान योजनेचा बारावा हप्ता 17 ऑक्टोबरला शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ही माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिले आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी जाहीर केल्यामुळे आता 17 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होतील हे निश्चित झाले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होण्यासाठी त्यांची ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. अजून बरेच शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी पुढील हप्ता मिळण्यासाठी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे.
Tags:
Pm Kisan Yojana