अर्ज कसा करावा?
Rabbi Biyane anudan शेतकऱ्यांसाठी सरकारने महाडीबीटी फार्मर हे पोर्टल बनवले आहे या पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी सर्व सरकारी योजना असतात. आता रब्बी बियाणे अनुदान योजनेसाठी महाडीबीटी फार्मर या पोर्टलवर अर्ज करावा लागतो. खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाल.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महाडीबीटी पोर्टल आल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांची प्रोफाईल बनवावी लागते. सुरुवातीला युजर आयडी आणि पासवर्ड बनवावे लागतात. त्यानंतर शेतकऱ्यांचे नाव मोबाईल नंबर आणि पत्ता भरावा लागतो. यानंतर शेतकऱ्यांच्या शेतीची सर्व माहिती म्हणजेच गट नंबर खाते नंबर क्षेत्र हे सर्व माहिती भरावी लागते. यानंतर घटक निवडा हा पर्याय येतो. येथे बियाणे आणि औषधे अनुदान योजनेसाठी हा घटक निवडावा आणि अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने योजनेसाठी निवड होते आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी अनुदान दिले जाते.