शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी अजून का नाही मिळाली 50 हजार जाणून घ्या.
शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर या दिवशी वितरित करण्यात येईल असे शासनाने सांगितले होते, यानंतर 2 ऑक्टोंबर या दिवशी जमा होईल असे सांगितले, परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत. याचे कारण आहे बँकेने पात्र शेतकऱ्यांची चुकीची माहिती शासनाने दिले आहे. या अनुदानाच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँकांना पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करून शासनाला द्यायची होती परंतु बँकेने शासनाला दिलेले यादीमध्ये अनेक चुका आहेत. काही शेतकऱ्यांचे बँक खाते चुकलेले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या नावांमध्ये चुका आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना केवायसी करणे अडचणीचे होणार आहे. तसेच शासनाने दिलेले अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळणारच नाहीत किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये जाऊ शकतात. म्हणून आता शासनाने बँकांना पुन्हा दुरुस्ती करून शेतकऱ्यांची यादी शासनाकडे देण्याचे आदेश दिले आहेत.