शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान या दिवशी येणार बँक खात्यात, तारीख झाली निश्चित

 

जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान आता लवकरच जमा होणार आहे. अनुदान जमा होण्याची तारीख ही शासनाने निश्चित केली आहे.

शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान योजना

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान या योजनेची देण्याची तारीख शासनाने निश्चित केली आहे. दिवाळीपूर्वी 20 ऑक्टोबर 2022 या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होईल असे संकेत शासनाने दिले आहेत. 

50 हजार रुपये अनुदान पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

50 हजार रुपये अनुदान कोणाला मिळणार

सन 2017 18, 2018 19, आणि 2019 20 या तीन आर्थिक वर्षात कोणत्याही दोन आर्थिक वर्ष शेतकऱ्याने कर्ज घेऊन विहित कालावतीत कर्जफेड केली असल्यास त्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. 


पात्र शेतकऱ्यांची यादी कुठे पाहता येईल. 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेची पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी निश्चित करण्यात आले आहे. ही यादी तुम्हाला कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये आणि सीएससी सेंटर मध्ये पाहायला मिळणार आहे. 


यादीत नाव असेल तर केवायसी करा 

शेतकरी मित्रांनो तुम्ही पन्नास हजार रुपये अनुदान योजनेस पात्र असाल तर तुम्हाला आधार केवायसी करणे बंधनकारक आहे त्याशिवाय तुम्हाला अनुदानाची रक्कम मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन आधार केवायसी करून घेणे आवश्यक आहे.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

Previous Post Next Post