नमस्कार शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेसाठी नवीन अर्ज सुरू झाले, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर मिळणार आहेत. राज्य कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत 240 कोटी निधी मंजूर झाला आहे. यासाठी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना सन 2022-23
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2022-23 यासाठी नवीन शासन निर्णय आला आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी एक लाख 25 हजार पर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन या वेबसाईटवर सुटलेले आहेत.
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
ट्रॅक्टर अनुदान योजना सन 2022-23 साठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत. महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन या वेबसाईटवर शेतकऱ्यांना सर्व कृषी यंत्र आणि अवजारांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतात. सध्या कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान योजना सुरू झाली आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी खाली अधिकृत वेबसाईटची लिंक देत आहोत.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.