नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई पोटी आतापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी सुद्धा मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ऑक्टोंबर मध्ये पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे.
आज पर्यंत कधीही सदिच्छा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नव्हती. मात्र सरकारने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे 7500 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ऑक्टोंबर मध्ये झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी शासनाने हेच निर्णय लागू केले आहेत. महसूल आणि कृषी विभागांमध्ये दिले होते त्याप्रमाणे सध्याच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून संदर्भात प्रशासनाला सूचना देण्यात आले आहेत असे माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितले.