माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आयुष्यमान भारत या योजनेमध्ये देशातील सर्व गरीब लोकांना पाच लाख रुपयांचा मोफत विमा दिला जातो. हे लोक जर कधी आजारी पडले किंवा ऑपरेशन आणि सर्जरी करावी लागली तर या लोकांचा सर्व खर्च सरकार करणार आहे. आयुष्यमान भारत योजना आहे ही सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय उपयोगी योजना आहे.
आयुष्मान भारत योजना
आयुष्मान भारत योजना मध्ये देशातील लोकांना पाच लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण दिले जाते. या योजनेसाठी पात्र लोकांचा पाच लाख रुपये पर्यंत सर्व दवाखान्याचा खर्च सरकार उचलणार आहे. म्हणजेच पात्र लोकांना पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे. या योजनेमध्ये सर्व शासकीय दवाखाने तसेच काही निवडक आणि स्पेशल असणारे खाजगी दवाखाने या योजनेमध्ये समाविष्ट आहेत.
सर्वसामान्य जनतेला आरोग्यासाठी विमा विकत घेणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नसते याचा विचार करून सरकारने या लोकांना मोफत किंवा संरक्षण दिले आहे.
या योजनेसाठी कोण पात्र आहे?
आयुष्मान भारत योजनेसाठी 2011 च्या जातीनिहाय आर्थिक सर्वेक्षणानुसार पात्र असणारे लोक या योजनेमध्ये पात्र आहेत. पात्र लोकांची यादी आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येते.
आवश्यक कागदपत्रे
आयुष्मान भारत योजना हेल्थ कार्ड बनवण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतात.
आयुष्यमान भारत योजना लेटर
आधार कार्ड
रेशन कार्ड
मोबाईल नंबर
आयुष्मान भारत कार्ड कसे काढावे
आयुष्मान भारत योजनेचे हेल्थ कार्ड बनवण्यासाठी तुम्ही जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन हे कार्ड बनवून घेऊ शकता तसेच तुमच्या गावातील ग्रामपंचायतच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये ही जाऊन तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे हेल्थ कार्ड बनवू शकता.