Join our WhatsApp group

आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड आयडी कसा काढावा आणि त्याचे फायदे काय आहेत

नमस्कार मित्रांनो, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयुष्मान भारत हेल्थ कार्ड योजना लोकांसाठी एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेत कुटुंबांना प्रत्येक वर्षी पाच लाख रुपये पर्यंत विमा मिळतो यामुळे कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आजारी असल्यास त्या व्यक्तीला पाच लाख रुपयापर्यंत उपचार मोफत दिला जातो. हे आयुष्यमान हेल्थ कार्ड असल्यास तुम्ही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घेऊ शकता. यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार नाहीत. संपूर्ण उपचार मोफत होणार आहे.


आयुष्मान भारत हेल्थ कार्ड कसे काढावे 

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड काढण्यासाठी जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे यानुसार कमी उत्पन्न गटातील कुटुंबाची निवड करण्यात आली आहे या कुटुंबांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढण्यासाठी तुमची या योजनेसाठी निवड असलेली पाहिजे तुमची या योजनेत नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून तुमच्या गावातील यादी पाहू शकता. 


आयुष्मान भारत यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी येथे क्लिक करा.


आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र

आधार कार्ड

रेशन कार्ड

आयुष्मान भारत हेल्थ कार्ड लेटर 


Post a Comment

Previous Post Next Post