5 लाख रुपये विमा संरक्षण देणारे, आयुष्मान भारत कार्ड कसे काढावे

मस्कार मित्रांनो, आयुष्मान भारत योजना देशातील गरीब लोकांना पाच लाख रुपये पर्यंत मोफत विमा संरक्षण देते. यासाठी या लोकांना कोणताही खर्च पडत नाही. आयुष्यमान भारत योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण देशामध्ये चालवली जात आहे. या योजनेचा फायदा देशातील अनेक लोक घेत आहेत. 


आयुष्मान भारत योजना काय आहे?

आयुष्मान भारत योजना ही योजना देशातील लोकांना पाच लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण देते यानुसार देशातील लोकांना पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार दिला जातो. अनेक प्रकारचे आजार सर्जरी, ऑपरेशन यांचा मोफत उपचार केला जातो. आयुष्मान भारत योजना अंतर्गत लोकांना मोफत विमा संरक्षण मिळत आहे. या पाच लाख रुपयांच्या विम्यासाठी लोकांना एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. 


आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड कसे काढावे? 

आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड जवळ असेल तर तुम्ही पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार घेऊ शकता. अनेक प्रकारच्या रोगांवर मोफत उपचार केला जातो. आयुष्यमान भारत योजनेची कार्ड काढण्यासाठी 2011 च्या जातीनिहाय आर्थिक सर्वेक्षणामध्ये निवड झालेली असणे आवश्यक असते. यानुसार आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र असणाऱ्या लोकांची यादी बनवण्यात आली आहे. कार्ड काढण्यासाठी यादीमध्ये नाव असणे आवश्यक असते. 


आवश्यक कागदपत्रे 

आधार कार्ड

रेशन कार्ड

आयुष्मान भारत योजनेचे लेटर

आणि मोबाईल नंबर


इत्यादी आवश्यक असतात. 


आयुष्मान भारत योजनेचे कार्ड कोठे काढावे?

आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन काढता येते. तसेच तुम्ही स्वतःही अधिकृत वेबसाईटवर जाऊन केवायसी करून हे कार्ड काढून घेऊ शकता. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी आयुष्यमान भारत यादीमध्ये नाव आवश्यक असते. 

Post a Comment

Previous Post Next Post