Join our WhatsApp group

अशी करा बांधकाम कामगार म्हणून नोंदणी, मिळतील 26 पेक्षा जास्त योजनांचे लाभ



Bandhkam Kamgar Nondani मित्रांनो तुम्ही जर बांधकाम संबंधित कोणत्याही प्रकारचे काम करत असाल तर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता. तुमचे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असल्यास तुम्हाला अनेक योजनांचा लाभ मिळतो. या विषयी माहिती आज आपण या लेखामध्ये घेत आहोत.

इमारतीच्य सुरवाती खुदाई काम करण्या पासून इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे जे कामगार काम करतात त्यांना बांधकाम कामगार म्हणतात त्यांना नोंदणी करता येते व योजणांचा लाभ घेता येतो.

 उदा. १) खुदाई कामगार

         २) सेंट्रींग कामगार

         ३) गवंडी कामगार

         ४) फींटींग ( फरशी, इलेक्ट्रीकल)

         ५) पेंटींग कामगार

         ६) फर्णिचर, सुतार कामगार

         ७) फॉब्रीकेटर्स,

         ८) वेल्डिंग 

बांधकाम कामगारास कोणत्या योजना मिळतात...👇

👉बांधकाम कामगारास स्वत:साठी लागणारे साहीत्य घरेदीसाठी -- ५,०००/- तीन वर्षातून एकदा.

👉 बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चास - ३०,०००/-

👉  बांधकाम कामगाराच्या पत्नीस  २ आपत्या पर्यंत

   १) नैसर्गिक प्रसुतीसाठी - १५,०००/-

    २) शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी - २०,०००/-

👉 बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास प्रती वर्षी..

       १) १ ली ते ७ वी -- २,५००/- प्रतीवर्षी

       २) ८ वी ते १० वी -- ५,०००/-प्रतीवर्षी

       ३) ११ वी १२ वी -- १०,०००/- प्रतीवर्षी 

       ४)  पदविका अभ्यासक्रम साठी - २०,०००/-

      ५) पदवी साठी - २०,०००/- 

      ६) अभियांत्रिकी पदवीसाठी - ६०,०००/-

      ७) वैद्यकीय पदवीसाठी - १,००,०००

     ८) MS-CIT चे शिक्षण घेण्यासाठी -- शुल्काची परीपूर्ती

 व इतर...

 👉  एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी -- १,००,०००/- मुदत बंद ठेव


👉 बांधकाम कामगाराच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी - १,००,०००/- अर्थसाहाय्य

👉 बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी -- ६,०००/- अर्थसाहाय्य

👉 बांधकाम कामगारास अपगत्व आल्यास - २,००,०००/- अर्थसाहाय्य

👉 बांधकाम कामगार मूत्यु झाल्यास अंतविधीसाठी -- १०,०००/- अर्थसाहाय्य

👉  बांधकाम कामगाराचा मूत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रति वर्ष असे सलग 5 वर्षे  -- २४,०००/- अर्थसाहाय्य

👉 बांधकाम कामगाराचा कामावर मूत्यु झाल्यास - ५,००,०००/- अर्थसाहाय्य

👉घर बांधणी साठी-

4,50000/-

(केंद्र शासन- 2,00000/-

कल्याणकारी मंडळ- 2,50000/-) अर्थसाहाय्य

👉 नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना लागू करणे .


👉 

 बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्यानंतर आपण वरील योजनांचा लाभ घेऊ शकता. 👷🙏


नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक 👇


१) नोंदणी अर्ज

२) पासपोर्ट आकारातील २ फोटो

३) - महानगर पालिका - शहर अभियंता यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत - ग्रामसेवक यांचा बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र

४) नियोक्त्याचे (इंजिनिअर/ठेकेदार) प्रमाणपत्र (९० दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला )

५) आधार किंवा मतदान कार्ड

६) रेशन कार्ड झेरॉक्स

७) बँक पासबुक झेरॉक्स


Post a Comment

Previous Post Next Post