फळबाग लागवडीसाठी 100% टक्के अनुदान, महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सुरू

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करून उत्पन्न वाढवावे यासाठी शासनही फळबाग लागवडीसाठी अनुदान देत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी पोर्टलवर सुरू झाले आहेत.


भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

या योजनेअंतर्गत आंबा चिकू सिताफळ आवळा डाळिंब यासारख्या फळ पिकांची लागवड करण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जात आहे. 

अर्ज कसा करावा

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये फळबाग तयार करायचे असेल तर तुम्हाला अगोदर अनुदान मिळवण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत ऑनलाइन अर्ज करावा लागेल. हा अर्ज तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड बनवावा लागतो. यानंतर तुमची सर्व माहिती तसेच शेतीचे सर्व माहिती भरून या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करावा लागतो. यासाठी तुम्हाला 23 रुपये इतकी फी भरावी लागते.


आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक पासबुक

शेतीचा सातबारा आणि खाते उतारा

तसेच जमिनीची माती परीक्षण अहवाल


वरील कागदपत्रे सोबत घेऊन तुम्ही फळबाग लागवड योजना अंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकता. तुम्ही तुम्ही जवळच्या नेट कॅफे मध्ये किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर या योजनेत तुमची निवड होते आणि तुम्हाला कागदपत्रे भरा असा मेसेज तुमच्या मोबाईलवर येतो. त्यानंतर या वेबसाईटवर तुम्ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर या कागदपत्रांची छाननी होऊन, तुम्हाला पूर्वसंमती येते. 


आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा



अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

Previous Post Next Post