राज्यात पोलीस भरती प्रक्रिया या आठवड्यात सुरू होईल. मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Maharashtra Police Bharati महाराष्ट्र राज्यामध्ये बहुप्रतीक्षेत असलेले पोलीस भरती प्रक्रिया  या आठवड्यात सुरू होणार आहे. त्यानुसार पोलीस शिपाई पदासाठीची ही भरती प्रक्रिया 18000 जागांसाठी असणार आहे. राज्य राखीव पोलीस दल व पोलीस वाहन चालक यांची स्वतंत्र भरती प्रक्रिया त्याचवेळी सुरू होणार आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असणारी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार होती. परंतु प्रशासकीय कारणामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सर्व तरुण सरकार विषयी नाराज होते. या सर्व परिस्थितीचा विचार करून  राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या आठवड्याभरात पोलीस भरती होईल. असे जाहीर केले आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 


पोलीस भरती अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


शिपाई पदांसाठी होणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. व त्यानंतर शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाच दिवशी आयोजित केली जाणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुद्धा किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. 


सन 2019 पासून कोरोना महामारी मुळे व इतर कारणांनी पोलीस भरती प्रक्रिया लांबत गेली होती. अनेक तरुण खूप आशेने या भरती प्रक्रियेची वाट पाहत होते. 


पोलीस भरती प्रक्रिया येथे क्लिक करा


आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Post a Comment

Previous Post Next Post