पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यात महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता मुदत वाढवून 15 डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे. 


राज्यात महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस विभागामध्ये तब्बल 18000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरती सध्या सुरू आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 9 नोव्हेंबर 2022 पासून ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत होती. परंतु अनेक तरुणांच्या सोयीसाठी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढ करण्यात आली आहे आणि आता अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 15 डिसेंबर ही असणार आहे.
Post a Comment

Previous Post Next Post