प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या हप्त्यामध्ये प्रत्येक चार महिन्यानंतर दिले जातात. या योजनेची नवीन नोंदणी आता सुरू झाले आहे. तुम्ही जर शेतकरी असाल आणि अजून या योजनेत नाव नोंदणी नसेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत नोंदणी करून दरवर्षी सहा हजार रुपये मानधन मिळू शकतात.
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदवण्यासाठी तुमच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे. तसेच तुमच्याजवळ रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. बदलत्या नियमानुसार पी एम किसान योजनेअंतर्गत नाव नोंदवणे शेतकऱ्यांसाठी अवघड वाटू शकते. परंतु आज आपण या लेखांमध्ये ज्या शेतकऱ्यांची नाव नोंद नाही, असे शेतकऱ्यांची नावे नोंदवण्यासाठी अर्ज कसा करावा याची माहिती घेणार आहोत.
पी एम किसान योजने साठी नवीन अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
आधार कार्ड
आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक
रेशन कार्ड
शेतीचा सातबारा आणि खाते उतारा
लँड रजिस्ट्रेशन आयडी
पी एम किसान योजनेसाठी नवीन अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक आहेत तसेच वर दिलेल्या व्हिडिओमध्ये अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत दिली आहे. अर्ज केल्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमचे अर्ज अप्रुव्हल होईल. आणि तुम्हाला दोन हजार रुपयाची हप्ते मिळण्यास सुरुवात होईल. केंद्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली योजना आहे. या योजनेचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags:
Pm Kisan Yojana