कृषी यांत्रिकीकरण योजना, ट्रॅक्टर, पावर टिलर, आणि सर्व कृषी यंत्रासाठी 50 टक्के अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 2022 साठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत यामध्ये शेतीसाठी लागणाऱ्या सर्व कृषी यंत्रासाठी सरकार 50% अनुदान देत आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा याची संपूर्ण प्रक्रिया आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. 


राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 2022

शासन निर्णयानुसार राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेला नवीन मंजुरी देण्यात आले आहे. कृषी यंत्राच्या खरेदीवर या योजनेअंतर्गत 50 टक्के पर्यंत सरकार अनुदान देणार आहे. शेतीसाठी उपयोगी सर्व प्रकारची यंत्र आणि अवजारे खरेदीसाठी सरकारमार्फत अनुदान दिले जाते. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल फार्मर या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो.

आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांचे आधार कार्ड

बँक पासबुक

शेतीचा सातबारा आणि खाते उतारा

अशी कागदपत्रे अर्ज करताना आवश्यक असतात. 


येथे क्लिक करून अर्ज करा.


वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही महाडीबीटी पोर्टल फार्मर लॉगिन च्या अधिकृत वेबसाईटवर येता. वेबसाईटवर शेतकऱ्याला युजर आयडी आणि पासवर्ड बनवावे लागतात यानंतर तो आपला अर्ज भरू शकतो. यूजर आयडी आणि पासवर्ड बनवल्यानंतर लॉगिन करून घ्यावे. नंतर सर्व वैयक्तिक माहिती आणि शेतीची माहिती भरून घ्यावी. त्यानंतर अर्ज करा यामध्ये ज्या कृषी यंत्रासाठी अर्ज करायचा आहे त्याची निवड करावी लागते. जसे की ट्रॅक्टर आवश्यक असल्यास ट्रॅक्टर हा घटक निवडावा लागतो तसेच त्याची इतरही माहिती द्यावी लागते. आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा. Post a Comment

Previous Post Next Post