50 hajar anudan Yojana : शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दुसरी यादी जाहीर करण्यात आले आहे. या यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे कसे पाहायचे याची माहिती या पोस्टमध्ये आपण घेणार आहोत.
पन्नास हजार अनुदान योजना दुसरी यादी जाहीर
सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना पन्नास हजार अनुदान योजनेची दुसरी यादी जाहीर करण्यात आले आहे. या योजनेचा हा दुसरा टप्पा आहे. या अगोदर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. आता राहिलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना अनुदान देण्यात येणार आहे.
अनुदान मिळण्यासाठी ई केवायसी आवश्यक
50 हजार अनुदान योजना दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे ज्या यादीमध्ये नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे केवायसी केल्यानंतरच त्यांना अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्येही आपले सरकार सेवा केंद्रामध्ये इ केवायसी करून घेऊ शकता. ई केवायसी करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल सोबत असणे आवश्यक असते.
Tags:
50 hajar anudan