
शेतकरी मित्रांनो, सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान योजनेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे या यादीमध्ये नाव आहेत का हे चेक करू शकता. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज भेट करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान दिले जात आहे. या योजनेच्या तिसऱ्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांना अनुदानाची रक्कम येणार आहे. शेतकऱ्यांनी यानंतर आधार केवायसी करून घ्यायची आहे तेव्हाच त्यांना अनुदानाची रक्कम मिळेल. तिसऱ्या यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्ही जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा कर्ज घेतलेला बँकेमध्ये जाऊन याद्या बघू शकता.