दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान, बेरोजगार तरुणांसाठी व्यवसायाची सुवर्णसंधी

Sarkari Yojana Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो, दूध व्यवसाय हा असा व्यवसाय आहे जो कायमस्वरूपी फायद्यात राहणार आहे. सध्याच्या परिस्थितीत आणि भविष्यातही दुधाची मागणी कायम राहणार आहे. आता सरकारही दूध व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान देणार आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत 50 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. ही माहिती केंद्रीय कृषी संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री डॉक्टर संजीव बल्यान यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले आहे. 


देशी गाईंच्या संगोपनाला चालना दिली जात आहे. प्रामुख्याने तरुण शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायी असल्याचे दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री डॉक्टर संजीव यांनी सांगितले आहे. करुणा संकट काळापासून कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात नवीन स्टार्टअप सुरू झाले आहेत. या क्षेत्रात नवीन व्यवसाय देखील वाढत आहेत. राष्ट्रीय गोकुळ योजना अंतर्गत सरकार गाय म्हैस कोंबडी शेळी आणि वराह पालनाच्या व्यवसाय करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान देणार आहे. त्यामुळे पन्नास लाखाहून अधिक लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल.




Tags : Dudh Vyavasay Subsidy Maharashtra,  Milk Business Subsidy Maharashtra, Dairy Subsidy

Post a Comment

Previous Post Next Post