सर्वांसाठी घरे 2024 हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील आता या धोरणाचा स्वीकार केला आहे. ज्या लोकांना पक्के घर नाही त्या लोकांना 2024 पर्यंत पक्के घर बांधून देण्याचा शासनाचा निर्धार आहे.
शासन निर्णय
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय आवास दिनापासून ते 31 मार्च 2023 या कालावधीत अमृत मा आवास अभियान 2022 23 राबविण्यात मान्यता देण्यात येत आहे. सर्वांसाठी घरे 2024 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणि हा या अभियानाचा हेतू आहे.
Tags:
Maha Avas Yojana 2022-23