आयुष्मान भारत योजनेची यादी येथे पहा, यादीत नाव असेल मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

आयुष्यमान भारत योजना या योजना अंतर्गत आर्थिक दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार दिला जातो. आयुष्यमान भारत योजनेचे गोल्डन कार्ड कसे काढावे याची माहिती या पोस्टमध्ये आपण घेत आहोत. 


आयुष्मान भारत योजना यादी

आयुष्मान भारत योजनेसाठी कुटुंबाची निवड या अगोदरच झालेले आहे. त्यामुळे या योजनेचे गोल्डन कार्ड काढण्यासाठी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का? हे अगोदर तपासून घ्यावी लागेल. खाली आयुष्मान भारत योजनेच्या पात्र लोकांची यादी देण्यात आले आहे. या यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही आयुष्यमान भारत योजनेची गोल्डन कार्ड किंवा इ कार्ड काढून घेऊ शकता.आयुष्मान भारत ची यादी मध्ये नाव आहे का ते तपासण्यासाठी येथे क्लिक करा. 


वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील पात्र लोकांची यादी पाहू शकता या यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड काढू शकता आयुष्मान भारत योजनेचे गोल्डन कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला दरवर्षी पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार दिला जातो. हा पाच लाख रुपयांचा विमा तुम्हाला अगदी मोफत दिला जातो.

आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी तुम्ही जवळच्या महा ई सेवा केंद्र मध्ये किंवा सी एस सी सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकता.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post