सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादना करिता प्रती हेक्टरी पंधरा हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादित प्रोत्साहन पर रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल अशी घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ धान उत्पादक जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार आहे. याचा फायदा सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल. असे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले. तसेच धान खरेदीत कोणतीही अनिमित्त झालेली तक्रार आली नाही. केंद्र शासनाने राज्याला पंधरा लाख मॅट्रिक टन धान खरेदीस मंजुरी दिली आहे अशी ही माहिती माननीय मुख्यमंत्री यांनी दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी राज्य सरकार अनेक योजना आणत आहे.