फळबाग लागवड योजना 100% अनुदान, आता केळी, ड्रॅगन फूड, द्राक्षे अशा फळपीक, आणि मसाला पिकांच्या लागवडीसाठी ही मिळणार अनुदान

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड वृक्ष लागवड व फुल पीक लागवड योजना अंतर्गत आर्थिक मापदंड बाबत शासन निर्णय 15 डिसेंबर 2022 रोजी आलेला आहे. या शासन निर्णयाची आणि या योजनेची माहिती आज आपण या पोस्टमध्ये घेणार आहोत.


फळबाग लागवड योजना महाराष्ट्र

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक लाभार्थीच्या शेतावर शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड किंवा वृक्ष लागवड व फुल पीक लागवड कार्यक्रम या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. या शासन निर्णयानुसार खालील नवीन पिके समाविष्ट करण्यात आले आहेत.

केळी

ड्रॅगन फूड

द्राक्ष

फुल झाड सोनचाफा,

 मसाल्याची पिके, लवंग, दालचिनी, मिरी, जायफळ


या योजनेअंतर्गत सुधारित मजुरी दर रुपये 256 प्रमाणे कुशल भागाचे मापदंड तसेच सामग्री करिता कलमेरूपंबाबत संचालक फलोत्पादन पुणे यांनी दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी प्रस्तावित केल्यानुसार नवीन पिकांबाबत मनुष्यदिन संख्या गृहीत धरून रासायनिक खताचा खर्च बघून परिशिष्ट अ प्रमाणे आर्थिक दंड निश्चित करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. 


 




Post a Comment

Previous Post Next Post