नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासन शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शासकीय अनुदान देत आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना नव्याने सुरू करण्यात आले आहे, ही योजना शासनाचे कृषी विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के, आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के असे तीन वर्षात एकूण शंभर टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.
अनुदान
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाचा उभारणी करता शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेअंतर्गत खालील पिकांसाठी अनुदान मिळणार आहे.
पात्रता
लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच बसवणे अनिवार्य आहे.
सर्व संवर्गा अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
सातबारा व आठ अ उतारा
हमीपत्र
संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांची समिती पत्र
जातीचे प्रमाणपत्र ( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी)
अर्ज कसा करावा
शेतकरी मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. यासाठी शेतकऱ्यांनी नेट कॅफे किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करावा. किंवा शेतकऱ्यांकडे कॅम्पुटर असल्यास स्वतःही अर्ज करू शकतात. परंतु मोबाईलवर अर्ज करता येत नाही. मोबाईलवर शासकीय वेबसाईट व्यवस्थित रित्या चालवणे थोडे अवघड आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट
👇👇👇