प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पात्र रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन धान्य दिले जाते. ही योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. सरकारच्या नवीन नियमानुसार आता या योजनेला एक वर्ष मुदत वाढ मिळून 2023 मध्ये संपूर्ण वर्षभर लोकांना या योजनेअंतर्गत मोफत रेशन धान्य दिले जाणार आहे.
फ्री रेशन योजना
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी रेशन कार्ड धारकांना विकतच्या धान्याबरोबर मोफत ही धान्य दिले जाते. ही योजना 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती या अगोदरही या योजनेला वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली होती. आता या योजनेला मोदी सरकारने एक वर्षाची मुदतवाढ अजून दिली आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांना वर्षभर मोफत धान्य योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये लोकांसाठी मोफत रेशन धान्य ही योजना अतिशय उपयोगी ठरली होती. सध्याच्या परिस्थिती नुसार अजूनही या योजनेची आवश्यकता सरकारला वाटत आहे. त्यामुळे ही योजना पुढील 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुरू राहील.
Tags:
free ration yojana