रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी, मोफत धान्य योजनेला एक वर्षाची मुदत वाढ

 

रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. आता मोफत रेषांनी योजनेला एका वर्षासाठी मदत वाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने मोफत रेशन योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केंद्र शासनाने वन रँक वन पेंशन योजनेमध्ये सुधारणाही केली आहे.


महिन्यातून एकदा उपलब्ध होणारे रेशन धान्य लॉकडाऊन सारख्या कठीण परिस्थितीत खूप लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आधार ठरले होते. त्यामुळे सरकारने पीएम गरीब कल्याण अन्न योजना या योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आता सरकार 2023 पर्यंत या योजनेअंतर्गत लोकांना मोफत धान्य देणार आहे. आता लोकांना स्वस्त धान्याबरोबरच मोफत धान्य ही दिले जाणार आहे. Tags :- Ration Card Maharashtra, Free  Ration Yojana

Post a Comment

Previous Post Next Post