दोन दुधाळ गाई म्हशी वाटप योजना, 75 टक्के अनुदान

 

 
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी दोन दुधाळ गाई/ म्हशी वाटप योजना शासनाकडून राबवली जाते. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचे अर्ज लवकरच पुढील काही दिवसात सुरू होणार आहेत. या योजनेविषयी संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टमध्ये घेणार आहोत. 


दोन दुधाळ गाई/ म्हशी वाटप राज्यस्तरीय योजना

या योजनेमध्ये शेतकऱ्यांना दोन गाई किंवा म्हशी विकत घेण्यासाठी 75 टक्के पर्यंत शासकीय अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये, अर्ज करणे अतिशय सोपी आहे. शेतकरी मित्र ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात तसेच त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये चकरा माराव्या लागणार नाही. 

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकते? 

1. महिला बचत गट
2. अल्पभूधारक भूधारक शेतकरी
3. सुशिक्षित बेरोजगार

-
सदरची योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई, मुंबई उपनगर तसेच दुग्धोत्पादन मध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा सांगली कोल्हापूर व अहमदनगर या जिल्ह्यांतर्गत राबवली जाणार नाही. 


शासकीय अनुदान 

अनुसूचित जाती 75 टक्के

सर्वसाधारण 50 टक्के
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
सातबारा
आठ अ उतारा
अपत्य दाखला / स्वयंघोषणापत्र
आधार कार्ड
सातबारा मधील लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,
रहिवासी प्रमाणपत्र
अनुसूचित जाती किंवा जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
बँक खाते पासबुक सत्यप्रत
दिव्यांग असल्यास दाखला
वय जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
शैक्षणिक पात्रतेचा दाखला  
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
Post a Comment

Previous Post Next Post