कडबा कुट्टी साठी असा करा ऑनलाईन अर्ज, मिळणार 100 टक्के अनुदान.

 

 
पशुपालन व्यवसाय करणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे महाडीबीटी फार्मर अंतर्गत कडबा कुट्टी ही योजना. या योजनेमध्ये शासन कडबा कुट्टी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देत आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा याची महत्त्वाची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. कडबा कुट्टी साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? 

कडबा कुट्टी अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो. या योजनेची सर्व कार्यवाही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जावे लागणार नाही. शेतकरी घर बसल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून कडबा कुट्टी अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

कडबा कुट्टी योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील स्टेप्स आहेत.


सर्वप्रथम गुगल वर महाडीबीटी  फार्मर असे सर्च करावे.

यानंतर महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी  स्वतःची यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्यावेत.

या वेबसाईटवर लोगिन केल्यानंतर शेतकऱ्याने स्वतःची प्रोफाइल बनवून घ्यावी लागते. त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व वैयक्तिक माहिती जसे की नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, बँकिंग डिटेल्स, रहिवाशी माहिती, अशी सर्व माहिती भरावी लागते.

यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या क्षेत्राची सर्व माहिती भरावी लागते. सातबारा आणि खाते उतारा यातील सर्व माहिती शेतकऱ्यांना भरावी लागते. 

यानंतर शेतकऱ्यांना शेतीमध्ये लावलेल्या पिकांची माहिती भरावी लागते. ही सर्व माहिती भरल्यानंतर शेतकरी कडबा कुट्टी साठी अर्ज करू शकतात. 

शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करावे, यानंतर बाबी निवडा यावर क्लिक करावे, 


कृषी यंत्राच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य हा पर्याय निवडावा, यानंतर कडबा कुट्टी हा पर्याय निवडून अर्ज करावा. 


शेतकरी मित्रांनो तुम्ही स्वतः अर्ज करण्यापेक्षा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन किंवा नेट कॅफे मध्ये जाऊन अर्ज करू शकता. यांची मदत घेतल्यामुळे तुम्हाला अडचणी येणार नाहीत. 

 Post a Comment

Previous Post Next Post