तुम्हाला रेशन किती मिळते आणि दुकानदार किती देतो, जाणून घ्या तुमच्या मोबाईलवर

 

बऱ्याच वेळा रेशन दुकानदार ग्राहकांना जेवढे रेशन धान्य मिळाले पाहिजे तेवढे देत नाही. तुम्हालाही जर असे वाटत असेल की रेशन दुकानदार कमी धान्य देत आहे तर तुम्ही शासन तुम्हाला धान्य किती देते हे ऑनलाईन पाहू शकता. 


तुमच्या गावातील रेशन दुकानदार तुम्हाला धान्य जर कमी देत असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता. की तुम्हाला शासन धान्य किती देते आणि दुकानदार किती देत आहे. यासाठी सरकारचे एक मोबाईल ॲप आहे. या मोबाईल ॲप चे नाव मेरा रेशन असे आहे. हे मोबाईल ॲप केंद्र सरकारच्या असल्याने यावर तंतोतंत खरी माहिती दर्शवली जाते. 


Mera Ration Mobile App 

👉 सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वर Mera Ration या नावाने सर्च करा.

👉 या नावाने सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर Mera Ration नावाचा ॲप दिसेल.

👉 हा ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे.

👉 त्यानंतर सर्व परमिशन अलाव करून घ्यायचे आहेत.

👉 त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये हा ॲप ओपन होऊन जाईल ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अनेक ऑप्शन दिसतील.

👉 यामध्ये दुसरा नंबर चा एक ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करा.

👉 त्याला क्लिक केल्यानंतर तुम्ही आधार कार्ड नंबर किंवा रेशन कार्ड नंबर टाकून चेक करू शकता.

👉 सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर स्पष्टपणे माहिती दिसून येईल तुमच्या रेशन कार्ड वर किती धान्य येते.
Post a Comment

Previous Post Next Post