देशातील तरुणांना स्टार्ट-अप आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, सरकार प्रधानमंत्री मुद्रा योजना (PM मुद्रा योजना) चालवत आहे. या योजनेअंतर्गत, सरकार ग्रामीण भागात नॉन-कॉर्पोरेट लघु उद्योग सुरू करण्यासाठी आणि विस्तार करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. या योजनेंतर्गत कर्ज घेतलेल्या लोकांनी कर्ज परतफेडीच्या बाबतीत शिस्त दाखवली आहे. या योजनेंतर्गत सरकारने सात वर्षांत 20.9 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. एका माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे.
कर्ज कोणत्या कारणासाठी घेता येईल? पीएम मुद्रा योजनेंतर्गत लहान दुकानदार, फळे, अन्न प्रक्रिया युनिट यासारख्या छोट्या उद्योगांसाठी कर्जाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत कर्जासाठी, तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, निवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि व्यवसाय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Tags
Mudra Loan Yojana